मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त भाजप महिला मोर्चातर्फे विविध सेवा उपक्रम; योग दिनही साजरा

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त भाजप महिला मोर्चातर्फे विविध सेवा उपक्रम; योग दिनही साजरा
बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने विविध जनजागृती व सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, तेलमुक्त (नो ऑईल) पाककला प्रशिक्षण तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांद्वारे पर्यावरण संवर्धन, स्वच्छतेचे महत्त्व, निरोगी आहारपद्धती तसेच योगाच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपण्याचा संदेश देण्यात आला. “सेवा ही संघटन” या संकल्पनेला बळ देत समाजहिताच्या कार्यात अधिक सक्रिय राहण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजप महिला मोर्चा कर्नाटकच्या राज्य सचिव डॉ. सोनाली सरनोबत, जिल्हा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा प्रियांका अजरेकर, ग्रामीण महिला मोर्चाच्या अध्यक्षा संध्या पाटील, जिल्हा महिला मोर्चाच्या सचिव भाग्यश्री कोकीटकर यांच्यासह महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
उपस्थितांनी स्वच्छ, हिरवेगार आणि निरोगी समाज उभारणीसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला.



